

board director
Connect with Our Managing Director


OUR GOAL
Driving Sustainability Through Innovation
At KNGS, our vision is deeply rooted in the soil of Bharat - to empower Indian farmers, transform rural life, and create a self-reliant India. Agriculture is not just a profession; it is our nation's strength, our culture, and our future. Our mission is to solve the real problems faced by Indian farmers - from unpredictable weather and low productivity to post-harvest waste and income instability. We are committed to creating innovative, sustainable solutions that turn farming waste into income-generating resources, ensuring that no part of the farmer's effort goes to waste. We believe in developing strong rural economies by generating employment opportunities for rural youth, promoting agri-business entrepreneurship, and building systems that help farmers become truly self-dependent. Our goal is not just to support farming but to transform it into a dignified, profitable, and respected livelihood. We aim to bring technology, training, and transformation to every farmer's doorstep, so that villages can thrive, youth can stay and grow locally, and India can move forward as a
"Gramodaya se Rashtra Uday"
(Nation's rise through village development).

THE FARMER
INDIA LIVES IN ITS VILLAGES,
THE HEART OF EVERY VILLAGE IS
To fulfil this vision, we are committed to establishing multiple processing and production plants across Maharashtra. These plants will serve as centres of innovation, employment, and Rural development- bringing value to the farm
producing and creating economic opportunities for the local communities. Our broader aim is to lead the movement towards Green Energy. Through our initiatives, we convert green grass and agricultural waste into green gas, paving
"FROM GREEN GRASS
TO GREEN GAS - POWERING
A SELF-RELIANT INDIA."
Let us walk together towards a stronger, greener, and self-reliant rural India.


Mr. Nishid G. Sawant
Managing Director
परिचय,
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली आपली शेती आणि त्यावर अवलंबून असलेले अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे आज अडचणीत सापडले आहेत. भारतीय शेती ही मुख्यतः हवामानावर अवलंबून असल्यामुळे सतत बदलणाऱ्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी पिके घेणे हे अधिकाधिक धोकादायक बनले आहे. त्यामुळे उत्पादनापेक्षा खर्च अधिक होतो. या विविध अडचणींमुळे शेती करणे हे तोट्याचे ठरत असून, अनेक शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पडत आहेत.
या सर्व समस्या लक्षात घेऊन 'केएनजीएस गोवर्धन ऊर्जा CNG प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीने शेतकऱ्यांसमोर उभ्या असलेल्या खरी अडचणी सोडवण्यासाठी, भारत सरकारच्या उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि प्रत्येक शेतकऱ्याला स्वावलंबी बनवण्यासाठी बायो-CNG निर्मितीचे ध्येय समोर ठेवले आहे.
बायो-CNG निर्मितीसाठी शेतीतील हत्तीगवत, पालापाचोळा, खराब झालेले टोमॅटो, बटाटे, वांगी, पालेभाज्या, शेणखत इत्यादी घटकांचा उपयोग केला जातो. हत्तीगवत हे बायोगॅस निर्मितीसाठी एक उपयुक्त पीक असून, त्याचे वर्षातून चार ते पाच वेळा उत्पादन घेतले जाऊ शकते. एका एकरातून साधारणतः 150 ते 175 टन हत्तीगवताचे वार्षिक उत्पादन मिळते, आणि त्यामुळे ते ऊसापेक्षा अधिक फायदेशीर ठरते.
‘केएनजीएस गोवर्धन ऊर्जा CNG प्रायव्हेट लिमिटेड’ हा भारतातील पहिल्या 10 TPD क्षमतेच्या बायोगॅस CNG प्रकल्पांपैकी एक असून, तो मौजे-अवसती (बु), ता. आंबेगाव, जि. पुणे येथे सुरू होत आहे. या प्रकल्पामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना शाश्वत उत्पन्न दिले जाईल व स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.
आमच्या या उपक्रमाद्वारे आम्ही हत्तीगवतासारख्या जैविक घटकांपासून हरित ऊर्जा तयार करत आहोत. हरित ऊर्जा (Green Energy) हेच आमचे अंतिम ध्येय आहे.
बायो सीएनजी निर्मितीसाठी आवश्यक असणारे मुख्य घटक
-
हत्तीगवत (Napier Grass) – 70%
-
प्रेसमड (साखर कारखान्यांतील अवशेष) – 20% ते 25%
-
कुजलेले अन्नद्रव्य व पालेभाज्या – 10% ते 15%
-
शेणखत – 5
या सर्व घटकांपासून दररोज सुमारे 10 टन बायो-CNG तसेच 50 ते 55 टन जैविक खते निर्माण करता येतात. हे खते शेतकऱ्यांना योग्य मोबदल्यात वितरित करता येतात. तयार केलेले बायो-CNG इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, ONGC, MNGL तसेच स्थानिक केमिकल कंपन्यांना पुरवले जाऊ शकते.
को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायट्यांना पाइपलाईनद्वारे गॅस वितरित करता येईल. कंपनी गॅस स्टेशन/पंप स्थापन करून किंवा फ्रँचायझी प्रणालीद्वारे गॅसचे वितरण करेल. या माध्यमातून वाजवी दराच्या तुलनेत जास्त दराने विक्री होऊन कंपनीला आर्थिक लाभ होईल.
केएनजीएस गोवर्धन ऊर्जा CNG प्रायव्हेट लिमिटेडने 2030 पर्यंत महाराष्ट्रात 5 ते 8 प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या माध्यमातून सुमारे 150 टन बायो-CNG चे उत्पादन होईल. आम्ही एकूण 5,00,000 शेतकऱ्यांबरोबर कार्य करत आहोत, ज्यामुळे ग्रामीण भारतात हरित ऊर्जा प्रसारित होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून भारत "आत्मनिर्भर" होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल.
हरित ऊर्जा उद्योग हा केवळ पर्यावरणपूरक नाही, तर आर्थिक दृष्टिकोनातूनही फायदेशीर पर्याय आहे. येत्या 20 ते 25 वर्षांत खनिज इंधनसाठे संपण्याची शक्यता लक्षात घेता, पर्यायाच्या स्वरूपात बायो-CNG महत्त्वाची भूमिका बजावेल.
चला तर मग, बायो-CNG च्या माध्यमातून एक हरित, आरोग्यदायी आणि आत्मनिर्भर भारत घडवूया — ‘सशक्त भारत’ घडवूया!
